अकोला येथे नैसर्गिक शेती कार्यशाळा; शिराळा शेतकरी गटाचा उत्स्फूर्त सहभाग

 


              Editor- Milind jamnik 


अकोला , स्थानिक प्रतिनिधी-: महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत विभागस्तरीय कार्यशाळा दि,२५एप्रिल२०२६ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला येथे आयोजित करण्यात आली होती.

    या कार्यशाळेचे उद्घाटन संचालक सुनील बोरकर यांच्या हस्ते झाले असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख उपस्थित होते. तसेच विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.



कार्यशाळेत नैसर्गिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती पद्धती, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय तसेच शाश्वत शेतीसंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.त्याचप्रमाणे नैसर्गिक शेतीशाळा राबविण्या करीता शेतीशाळा मोड्यूल देवून माहिती देण्यात आली.

  या कार्यशाळेला शिराळा येथील सहाय्यक कृषि अधिकारी मारोती जाधव यांच्या सोबत ‘पगलानंद महाराज शेतकरी बचत गटाचे' अध्यक्ष मंगेश पाटील काळमेघ तथा संचालक मंडळाने भेट देत सक्रिय सहभाग नोंदविला. उपस्थितांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत आधुनिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला.




Post a Comment

Previous Post Next Post