महाराष्ट्र
माहूर तालुक्यातील सिंदखेड व सतीगुडा येथील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दररोज या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी शेतकरी तसेच प्रवासी व आरोग्य उपकेंद्र असल्याने मोठ्या प्रमाणात येजा करतात मात्र खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहन चालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यामुळे पाणी साचल्याने परिस्थिती आणखी बिकट होते. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होत आहे.


