क्रांती ज्योतिबा फुले यांच्या 199 जयंती निमित्त बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने बाईक रॅली संपन्न

 




अमरावती -बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने शनिवार दि.11एप्रिल ला सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मा. अनिल भटकर उपजिल्हाधिकारी पुतड्याला हार अर्पण मेणबत्ती लावून, बाईक रॅलीला उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपजिल्हाधिकारी यांनी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले.

 बाईक रॅलीमध्ये बुद्ध जयंती उत्सव समितीचे मुख्य संयोजक,सुनील रामटेके यांच्या नेतृत्वात बुद्ध जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

त्यात प्रामुख्याने धनंजय गुळदेकर वीर पिता आजच समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष साठे शालवण ग्रुपचे रणजीत चव्हाण आक्रमण संघटनेचे एडवोकेट सुनील गजभिये भारतीय बौद्ध महासभेचे सुखदेवराव इंगोले रविकांत गवई रत्नाकरची शिरसाट सुनील मेश्राम, चंद्रकांत मेश्राम ,संजय भोवते ,राष्ट्रपाल घरडे, सिद्धार्थ दामोगरे, रतन मेश्राम, व्यंकट खोब्रागडे, रुपरावजी बनसोड ,भारत पाटील, आशाताई नागदिवे सुनीताताई नागदिवे, अनिता गवई आशाताई बडगे यांनी बाईक रॅलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या व महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला रैली महात्मा फुले चौक येथील महात्मा ज्योतिबा फुलेंना आर आर पण करून अभिवादन करण्यात आले व रॅलीचा समारोपिय कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post