पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमरावती शहर अध्यक्ष, युवा सामाजिक कार्यकर्ते आयु. प्रविण सरोदे यांचा वाढदिवस साजरा...

 

Maharashtra happy Birthday



विशेष प्रतिनिधी/राजाभाऊ वानखडे 


अमरावती : फुले शाहू आंबेडकर चळवळीतील युवा सामाजिक कार्यकर्ते, तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमरावती शहर अध्यक्ष ,राहुल नगर अमरावती येथील रहिवासी आयु. प्रवीण सरोदे यांचा वाढदिवस दिनांक 2 मार्च 2026 रोजी मालटेकडी परिसरात आनंदात साजरा करण्यात आला.

 प्रवीण सरोदे बालपणापासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असून ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे युवा कार्यकर्ते आहेत. 

  राहुल नगर बिच्छू टेकडी परिसरात अनेक समाजप्रबोधनाचे कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात घेतले असून, त्यांना सामाजिक ,धार्मिक ,राजकीय संस्कृतीक क्षेत्रात काम करण्याची फार मोठी आवड आहे. त्यांच्या कार्याची दखल घेता बहुजन समाज पार्टीचे स्टार प्रचारक तथा माजी नगरसेवक सुरेश भाऊ मेश्राम यांच्या वतीने आज प्रवीण भाऊ सरोदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकानेक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

 याप्रसंगी सुरेश मेश्राम, स्टार प्रचारक बसपा, ज्ञानेश्वर डोंगरे, वसंता चव्हाण, राजा वानखडे पत्रकार, युवा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ गोंडाणे, धिरज रंगारकर, गवई , शाहू राव बोरकर, प्रवीण मंडे, अनिल माहोरे,मानकर साहेब, वामनभाऊ यांच्यासह अनेक गणमान्य नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

Previous Post Next Post