खाजगी इंग्रजी शाळांमधील अपात्र शिक्षकांवर व संस्था चालकानवर मनसे विद्यार्थी सेनेची कारवाईची मागणी – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

             

MNS GavakadachiBatmi


         जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत 

यवतमाळ, दि. ३ जून : जिल्ह्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अपात्र शिक्षकांची भरती होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शाळांची तपासणी केली जाते, परंतु या तपासणीत शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, पोलीस व्हेरिफिकेशन आणि इतर महत्त्वाच्या बाबींची तपासणी केली जात असल्याचा पुरावा नाही. अनेक शाळांमध्ये शिक्षक हे पदवीधर नसूनही त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेमले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ ५ ते १० हजार रुपये मानधनावर अपात्र शिक्षक शाळांमध्ये नियुक्त होत असून, दुसरीकडे शाळा पालकांकडून हजारो रुपयांचे शुल्क घेत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

नुकत्याच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापिका पदावरील अपात्र शिक्षिकेने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. ही बाब चिंताजनक असून, अशा घटनांमुळे शाळांमध्ये अपात्र व अनधिकृत व्यक्ती शिक्षक म्हणून काम करत असल्याचा संशय बळावतो.

Ujjwal bharat mahila


या पार्श्वभूमीवर मनसे विद्यार्थी सेनेने जिल्ह्यातील सर्व खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व पोलीस व्हेरिफिकेशन तात्काळ करण्यात यावे, अपात्र शिक्षकांवर व संस्था चालकानवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यासाठी स्वतंत्र व विशेष तपासणी समिती नेमण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजीत नानवटकर, मनसे शहर अध्यक्ष अमित बदनोरे, साईराम कवडे, प्रथमेश पाटील, अमितेश आडे, दर्शन नानवरे, तुषार कटपेलवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post