स्वर्गीय कोठुजी कुंभारे वसतीगृहाचे इचलकरंजीत उद्घाटन #GavakadachiBatmi

Gavakadachi Batmi, gavsheli Maharashtra



इचलकरंजी(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

मुंबईतील दानशूर समाज बांधव कै . कोठूजी कुंभारे यांच्या स्मृती चिरंतर ठेवण्याच्या उद्देशाने बांधलेल्या कै. कोठूजी कुंभारे वसतीगृहाचे उद्घाटन हम्पी येथील गायत्री पिठाचे अधिपती श्री श्री श्री दयानंद पुरी महास्वामीजी यांच्या शुभहस्ते, व महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते व मॅनिंजिंग ट्रस्टी अंकुशराव उकार्डे यांचे प्रमुख उपस्थित दिमाखदारपणे संपन्न झाले महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाने केलेल्या आर्थिक मदतीने व श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांनी या वसतिगृहाचे बांधकाम केले आहे . 

याप्रसंगी मार्गदर्शन करताना स्वामीजींनी कोष्टी समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा प्रसार, आर्थिक प्रगती व समाजाची एकता होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. प्रारंभी देवांग समाज अध्यक्ष विश्वनाथ मुसळे व त्यांच्या पत्नी विद्याताई यांच्या हस्ते त्यांची पाद्यपूजा करण्यात आली. 

   स्वामीजींचा सत्कार महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष  प्रकाशराव सातपुते व अंकुशराव उकार्डे यांचे हस्ते व कोष्टी फेडरेशनचे अध्यक्ष अरुणराव वरोडे यांच्या उपस्थित संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक देवांग समाजाचे अध्यक्ष  विश्वनाथ मुसळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित ढवळे यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन राजेंद्र सांगले यांनी केले. याप्रसंगी देवांग समाजाच्या चौंडेश्वरी गृहनिर्माण, महिला मंडळ, महिला पतसंस्था, युवा संघटना इत्यादी विविध संस्थांच्या वतीने स्वामीजींचा सत्कार करण्यात आला.

या उद्घाटन प्रसंगी , निमंत्रित ट्रस्टी,  राजेंद्र ढवळे, उपाध्यक्ष उदयराव बुगड, सल्लागार विश्वनाथ मुसळे, विठ्ठलराव डाके, महासचिव रामचंद्र निमणकर, सचिव मिलिंद कांबळे उदयराव बुगड , महिला कार्याध्यक्ष स्मिता सातपुते, तसेच स्मिता बगड, संगीता धूत्रे, प्रीती बुगड, दीपा सातपुते, सुशीला फाटक, उज्वला कबाडे ,रूपा बुगड तसेच दिलीप भंडारे ,शितल सातपुते विलास पाडळे, डी,एम कस्तुरे ,राजेंद्र चांगले, प्रमोद मुसळे, कुमार कबाडे मधुकर वरुटे ,आनंदा साखरे, उत्तम म्हेत्रे, जयेश बुगड राहूल सातपुते दयानंद लिपारे महेश ढवळे इत्यादी मान्यवर तसेच समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post