पत्रकार उत्कर्ष समितीचे पुढील उपक्रम अधिकाधिक व्यापक व्हावेत..! मनोज सानप ठाणे जिल्हा माहिती अधिकारी

 

Thane


            पनवेल, प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर

डॉ. अशोक म्हात्रे यांचे कार्य खूपच कौतुकास्पद असून पत्रकार उत्कर्ष समितीचे पुढील उपक्रम अधिकाधिक व्यापक व्हावेत. पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे  यांनी काल ठाणे जिल्हा माहिती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी आपले मत व्यक्त केले. 

    यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना शाल व सन्मान चिन्ह भेट दिले.समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी पत्रकार उत्कर्ष समितीच्या विविध कार्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना दिली. माध्यमाचे बदलते स्वरूप बदलत्या काळात नवनवीन माध्यमांचा उपयोग याबद्दल सखोल मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी यावेळी केले. 

      पत्रकार उत्कर्ष समितीच्या अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपक्रमाचे मनोज सानप यांनी कौतुक केले पुढील उपक्रम अधिकाधिक व्यापक व्हावेत, डॉ. अशोक म्हात्रे यांचे कार्य खूपच कौतुकास्पद असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव डॉ.वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post