बहुजन समाज पार्टीच्या विधानसभा अध्यक्षपदी दीपक वानखडे यांची निवड तर विधानसभा उपाध्यक्षपदी प्रकाश पाटील

 


बहुजन समाज पार्टीच्या विधानसभा अध्यक्षपदी दीपक वानखडे यांची निवड तर विधानसभा उपाध्यक्षपदी प्रकाश पाटील



बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनिलजी डोंगरे यांच्या आदेशानुसार बसपाचे पश्चिम विदर्भ झोन प्रभारी मा. इंजि. दादारावजी उईके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बहुजन समाज पार्टी कारंजा - मनोरा विधानसभा ची बैठक स्थानिक विश्रामगृह येथे संपन्न झाली. 

या बैठकीमध्ये वाशिम जिल्हा अध्यक्ष ॲड. राहुल गवई जिल्हा प्रभारी भाऊराव वासनिक , जिल्हा प्रभारी ॲड.संघनायक मोरे यांनी विधानसभा अध्यक्ष पदी दीपक वानखडे यांची निवड केली.

    तसेच विधानसभा उपाध्यक्ष प्रकाश पाटील , विधानसभा महासचिव पवनकुमार कदम कारंजा विधानसभा प्रभारी व जिल्हा सचिव बबलू वाहने यांची निवड केली.

  कारंजा शहराध्यक्ष पदी प्रशांत लेवे, कारंजा विधानसभा सचिव विनोदकुमार सोनोने, कारंजा सहसचिव राहुल इंगळे, कारंजा विधानसभा संघटक रवींद्र बडगे यांची निवड केली तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post