निसर्गाची किमया उद्घाटनाच्या दिवशीच केली निकृष्ठ दर्जाच्या कामाची पोल खोल....!

 

Murtizapurnews , GavakadachiBatmi


तिकीट घराच्या मुख्य दारात पाण्याच्या गळतीने प्रवाशांचे स्वागत


Gavakadachi Batmi News



मूर्तिजापूर - अमृत भारत योजने अंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा पूनर्विकसीत सभारंभ दुर दृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २२ मे रोजी पार पडला अशातच उत्तमपणे सजावट केलेल्या तिकीट घराच्या मुख्य प्रवेश दाराचे निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याचे दिनांक २१ मे रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने पोल खोल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.





.   "अमृत भारत स्टेशन" योजने अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान च्या बिकानेर येथे एकूण २६ हजार कोटींच्या देशाच्या १८ राज्यातील ८६ जिल्ह्यातील १०३ रेल्वे स्थानकाचा समावेश असून मध्य रेल्वे च्या भुसावळ विभागातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे आभासी पद्धतीने (व्हिडीओ कॉन्फरन्स) उदघाटन केले या कार्यक्रमास खासदार अनुप धोत्रे, आमदार हरिष पिंपळे यांनी रिबीन कापून प्रत्यक्षात उदघाटन केले. "अमृत भारत स्टेशन" योजनेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सावदा, मूर्तिजापूर, धुळे, लासलगाव व देवळाली या रेल्वे स्टेशन चा समावेश आहे. 

मात्र मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर चक्क उदघाटनाच्याच दिवशी निसर्गाने आपली किमया दाखवीत १३ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या विकास कामाच्या भ्रष्टाचाराचे भिंग फोडत निकृष्ट दर्जाच्या कामाची पोल खोल केली. 

करोडो रुपये खर्चून मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर बांधण्यात आलेल्या नवीन तिकीट घर इमारतीचे व दोन्ही मुख्य प्रवेश द्वार (प्रवेश गेट) चे छत पावसाच्या पाण्याने गळत असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पाण्याच्या गळती ने होत असल्याने कंत्राकदाराने या कामात मोठा भ्रष्टाचार करत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे संताप जनक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून या गांभीर्याकडे विद्यमान खासदार अनुप धोत्रे, आमदार हरिष पिंपळे व भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक इति पांडे जातीने लक्ष घालून संबंधित ठेकेदारावर कारवाई करतील का..? या कडे मूर्तिजापूर करांचे लक्ष लागले असून करोडो रुपयांच्या खर्चाला चूना लागला की काय यावर उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.



सदरच्या ठिकाणी दुमजली इमारत बांधकाम करण्याचा निर्णय सरकार स्तरावरून केला आहे. त्यामुळे छतावरील फ्लोअरींग करण्याचे काम बाकी असल्याने त्याठिकाणी गळती लागली आहे.

श्री एन. वानखडे, स्टेशन मास्टर

मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन


Tags : Indian railway, GavakadachiBatmi, Maharashtra, India, murtizapurnews,  akolanews 

Post a Comment

Previous Post Next Post