किनवट तालुक्यातील मोहपूर खेडीला काल सायंकाळी झालेल्या वीजेचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊसाचा मोठा फटाका बसला असुन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे.काल अचानक झालेल्या वादळीवाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेकांच्या घराच्या छतावरील टिने उडाली, वीजेचे खांब,झाडे पडल्याने घराजवळील उभे असलेल्या वाहनांनशचा देखील मोठे नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल घडवून येत असल्याचे दिसून येत होते.काही वेळा तर ढगाळ वातावरण असताना देखील वारे वाहुन वातावरण निरभ्र होत असे यामुळेच कदाचित काल झालेल्या वादळी वाऱ्याचा अंदाज नागरिकांना कदाचित लावता आले नाही.कारण परिसरात आजपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा भार कमी पाहवयास मिळाले काही ठिकाणी हलके वारे वाहत असे तर काही ठिकाणी हलका पावसाची हजेरी दर्शवित असे.त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेता येत असे परंतु काल सायंकाळी अचानक झालेल्या वीजेच्या गडगडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे नागरिकांना या परिस्थितीतून बचावासाठी नियोजन देखील लावता आले नाही.याचा फटका खेडी वासियांना सहन करावा लागला.छतावरील टिन उडाल्याने अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जीवाचे संरक्षण करण्यासाठी शेजारील घराचा आसरा घ्याची वेळ आली. अशात घरातील जीवनावश्यक वस्तू, उपकरणे, उदरनिर्वाह उपयोगी सामग्री पावसामुळे भिजल्याने काही कुटुंबांना उपाशीपोटी व उघड्यावर झोपावे लागले.अशात सामान्य शेतीवर उपजीविका करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक फटका तर बसलाच शिवाय निवारा देखील शिल्लक राहिले नाहीत अशात खेडी वासियांसाठी शासन कोणते पाऊले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.