गावाकडची बातमी | राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचा प्रारंभ अंगोडा या गावातील बैलजोडी पूजन व उत्कृष्ट बैल जोडीमालकांचा सन्मान

 

Farmers, village news, village friends, GavakadachiBatmi



राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचा प्रारंभ अंगोडा या गावातील बैलजोडी पूजन व उत्कृष्ट बैल जोडीमालकांचा सन्मान 

भारताचे माजी पंतप्रधान व विज्ञान क्रांतीचे जनक स्व. राजीव गांधी त्यांच्या 21 मे 2025 स्मृतिदिनी सर्व शेतकरी बांधवांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ..

शेतकरी समाजाने कृषी क्षेत्राला विज्ञानाची जोड देणारे महान नेते स्व. राजीव गांधी तसेच कृषिरत्न पुरस्काराची मुहूर्तमेढ होणारे स्व.एड. राजीव सातव केले सामूहिक अभिवादन..

गेल्या 19 वर्षापासून नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीचा अविरत शेतकरी सन्मानाचा उपक्रम..

शेतकरी शास्त्रज्ञ मंच व राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीच्या विद्यमाने अंगोडा येथे खरीपपूर्व शेतकरी संवाद मेळावा संपन्न. 

शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती..

दिनांक 21 मे 2025 ते दिनांक 27 मे 2025 या कालावधीत शेतकरी सन्मान सप्ताह म्हणून निवड झालेल्या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण शेतीचा व शेती पद्धतीचा सन्मान करणार.. प्रकाश साबळे यांचे संबोधन .

शेतकऱ्यांना बांधावर दिला जाणारा सन्मान महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा असे गौरवोद्गार ग्रामगीताचार्य व जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी पौर्णिमाताई सवाई यांनी काढले.



अंघोडा या गावी उत्कृष्ट नऊ बैल जोडयांचे पूजन करून बैलजोडी मालकांचा सहपत्नीक शॉल,श्रीफळ, सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र तसेच बैल पोळ्याला घेतला जाणारा संपूर्ण बैलजोडीचा साजशृंगार भेट स्वरूपात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. 

याप्रसंगी ग्रामगीताचार्य पौर्णिमा ताई सवाई, डॉ. दिलीप काळे, भैय्यासाहेब निचळ, अविनाश पांडे, प्रकाश साबळे, डॉ. सतीश निचळ, तालुका कृषी अधिकारी गुल्हाने, राजू जोशी, माजी सरपंच मीनाताई कडू, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

गाव सहेली


राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सदस्य प्रा. सुनील सावळे, सुनील भगत राहुल तायडे, अमित कुचे, ऐनल्लाखान, अक्षय साबळे,किरण महले, सचिन महले, अनिकेत खोडे, आदी मंडळींनी सदर सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

 नागोराव पंडित, मयूर चौधरी, अक्षय पंडित, गौरव पंडित ,कुणाल पंडित, अशोकराव पंडित ,शंकरराव पंडित, सुभाषराव पंडित, मनोज चौधरी या उत्कृष्ट बैलजोडी मालकांचा सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post