वाशिम : बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष परम आदरणीय बहिण कुमारी मायावतीची यांच्या दिशा निर्देशानुसार व प्रदेश प्रभारी मा. खा. राजारामजी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविणार. दोन दिवसा अगोदर राज्यातील बसपा कार्यकर्त्यांना ज्या निवडणुकीमध्ये संधी मिळते त्या निवडणुका स्थगित असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याच्या निर्देश राज्य सरकारला तथा निवडणूक आयोगाला दिल्यामुळे कार्यकर्त्यातील नेता जागरूक होऊन जनतेचे प्रति निधित्व करू शकतो. त्याच निवडणुका काही कालावधीतच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुजन समाज पार्टी आपल्या निशाणीवर लढवून सभागृहात जाण्याची संधी निर्माण करून देणार आहे. वाशिम जिल्ह्यासोबतच संपूर्ण राज्याचा दौरा बहुजन समाज पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनीलजी डोंगरे यांनी सुरु केला. वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना सुद्धा आगामी होणाऱ्या निवडणुकीला तयारीला लागा अशा सूचना दिल्या. सोबतच बहुजन समाज पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष एड. राहुल गवई नियुक्तीपत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाशिम जिल्ह्याच्या तीनही विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन आढावा सभेला सुरुवात केली होती. या बैठकीला उपस्थिती म्हणून पश्चिम विदर्भ झोन प्रभारी प्रा. दादाराव उईके, मराठवाडा विदर्भ झोन प्रभारी एड.साहेबराव शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष एडवोकेट राहुल गवई यांनी आपली भूमिका मांडली.
जिल्हा प्रभारी प्रकाश आठवले, एडवोकेट संघनायक मोरे, भाऊरावजी वासनिक, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश वानखेडे, कोषाध्यक्ष भारत सावळे, कारंजा विधानसभा अध्यक्ष दीपक वानखेडे, ऋषभ विधानसभा अध्यक्ष उमेश जाधव, सुजय पाटील, पवन कुमार कदम, प्रकाश पाटील, प्रकाश जाधव, मैंदकर, प्रमोद कंकाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

