बुलढाणा, दि.१७ :- खुला, मागासवर्गीय व इतर जाती जमातीचे शेत जमिनीचे कुटुंबात होत असलेल्या वाटणीपत्रकाची/हस्तांतरणाची परवानगी बॉण्डपेपरवर लेखी घेवून देण्यात येते. त्याप्रमाणे अनुसूचित जातीच्या आदिवासी शेतकरी कुटुंबियांना जमिनीच्या वाटणीपत्रकाची परवानगी बॉण्डपेररवर लेखी घेवून देण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा नंदिनी टारपे यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खुला, मागासवर्गीय व इतर जाती जमातीचे शेत जमिनीचे कुटुंबात होत असलेल्या वाटणीपत्रकाची / हस्तांतरणाची परवानगी बॉण्डपेपरवर लेखी घेऊन तहसीलदार यांच्याकडूनच देण्यात येते. परंतु, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अनुसुचित जमाती (आदिवासी) चे शेत जमिनीचे कुटुंबात होत असलेल्या वाटणीपत्रकाची / हस्तांतरणाची परवानगी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेऊन खरेदी विक्रीचे मुद्रांक शुल्क भरून वाटणीपत्रक करावे लागते. त्यामुळे अनुसूचित जमाती (आदिवासी) चे शेतकऱ्यांना ही कार्यालयीन बाब खूप खर्चिक होत आहे.
त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खुला, मागासवर्गीय व इतर जाती जमातीचे शेत जमिनीचे कुटुंबात होत असलेल्या वाटणीपत्रकाची / हस्तांतरणाची परवानगी प्रमाणे अनुसुचित जमाती (आदिवासी) चे शेतकरी धारण करीत असलेली वर्ग १ तसेच वर्ग २ शेत जमीन संबधित शेतकरी यांच्याकडून बॉण्डपेपरवर लेखी घेऊन वाटणीपत्रकाची / हस्तांतरणाची (खरेदी विक्री व्यवहार वगळून) परवानगी सर्व तहसीलदार यांच्याकडूनच देण्यात यावी, अशीही मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा नंदिनी टारपे यांनी केली आहे.