महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 15 मे स्मृती दिना निमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सर्वधम्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या कार्यक्रमात दि.15 मे 2025 रोजी मौलाना अबुल कलाम आजाद संबोधन केंद्र येथे पार पडलेल्या मान्यवराच्या उपस्थितीत कव गायक शाहिर उतमराव म्हस्के यांना सेवानिवृत्त पोलिस आयुक्त हरिष बैजल,बैजल मॅडम कार्यक्रमाचे संयोजक मधुकर भोळे यांच्या हास्ते स्मृतीचिन्ह देऊन शाहिर म्हस्के यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरणूकित उत्कृष्ट देखाव्याच्या सादरी करनाचे बक्षीस वितरण आणि वामनदादा कर्डक यांच्या पावलावर पाऊल ठेवून बुंध्द भिम गीते सादर करणा-यां कलवंताचा सत्कार करण्यात आला तसेच अंतर जाती विवाह जोडप्याचा सत्कार सुध्दा करण्यात आला. व्यासपीठावरी सर्व मान्यवराचा सत्कार करण्यात आला या वेळी सेवानिवृत्त पोलिस आयुक्त मा.हरिष बैजल यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या आठवणी सांगीतल्या.
प्रास्तावीक भाषण ज्ञानेश्वर खंदारे यांनी केले तर सूत्रसंचालन दै.लोकमत चे जेष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर यांनी केले.