संपूर्ण जिल्हा परिषद यंत्रणा आज मेळघाट मुक्कामी !!

 

Dharani, Chikhaldara, Melghat


 गावाकडची बातमी -विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव 

अमरावती : पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून २३ मे रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी मेळघाटातील दुर्गम भागातील तसेच पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावात मुक्कामी जाणार आहेत.

या ठिकाणी रात्री मुक्काम करून संबंधित गावातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी व अन्य सुविधांचा ऑनस्पॉट आढावा घेणार आहेत. खुद्द जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजिता महापात्र या अतिदुर्गम कुटीदा गावात मुक्काम करणार आहेत.

गाव सहेली गावाकडची बातमी


कोण कुठे मुक्कामी ?

सीईओ संजीता महापात्र - कुटीदा, प्रकल्प संचालक प्रीती देशमुख -बिच्छुखेडा, बालासाहेब बायस -रेहट्याखेडा, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड - कुही, सुनील जाधव -बोराट्याखेडा, डॉ. पुरुषोत्तम सोळंके -खडीमल, कृषी अधिकारी मल्ला तोडकर - डोमी, शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे -चुनखडी, समाजकल्याण अधिकारी ज्ञानोबा पुंड माडीझडप, डीएचओ डॉ. सुरेश आसोले- राक्षा, डेप्युटी सीईओ विलास मरसाळे - रायपूर, प्रतीक चन्नावार - बोदु, बीडीओ सुदर्शन तुपे -नवलगाव, सुधीर अरबट - सिमोरी, श्रीकृष्ण खताळे खटकाली, नारायण आमझरे अढाव, तेजश्री आवळे -मसोंडी, उज्ज्वला ढोले भुलोरी, डॉ. स्नेहल शेलार - बेला, संजय पाटील-आहाड, अभिषेक कासोदे मेहरिआम, विजय गायकवाड - मोथाखेडा.


गाव मुक्कामानंतर २४ मे रोजी चिखलदरा येथे सीईओंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत एचओडींना अहवाल सादर करावा लागणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सुत्रांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post