गावाकडची बातमी उपसंपादिका, मंगला भोगे
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंती निमित्त जगदीश नगर येथे शाहिर उत्तमराव म्हस्के यांचा बुंध्द भिम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम. न्यु पहाडसिंगपूरा आणि जगदीश नगर याच्या सयुक्त विद्दामाने या वर्षी मोठ्या उत्साहाने भिम जयंती साजरी करण्यात आली. 13 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले बांलकाच्या विविध गूणदर्शन आणि रात्री 8 वाजता शाहिर उत्तमराव म्हस्के याच्या संचाचा बुंध्द भिम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या संचात शाहिर उत्तमराव म्हस्के आणि गायक रामभाऊ निकाळजे. गायक अरुण कांळे. ढोलकीवादक विनोद निकाळजे. तबला कांळे बंधू जी तर बॅजो वादक मधूकर शेजवळ होते.
बुंध्द भीम गीते ऐकण्यासाठी मंडपात पुरूष आणि बालकासह महिलानी गर्दी केली होती. या कार्यक्रमात प्रमूख अतिथी राम उपाध्याय. तर ज्योती उपाध्याय यांची उपस्थिती होती. पत्रकार उन्मेश खंडागळे. डाॅ. सरोज ताई वाघमारे आणि सर्वच भिम जयंती समीती चे सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी होण्या साठी परिश्रम घेतले..
