पनवेल(सुकापूर प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)जागतिक कीर्तीचे महामानव,घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची१३४वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली.देशभरात सर्व ठीकाणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.त्याच अनुषंगाने नविन पनवेल येथील सुकापूर येथे स्वागत काॅम्प्लेक्स परिसर आयोजित डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जनजागृती सेवा संस्थेने सक्रीय सहभाग घेऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होऊन अभिवादन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक राजेश केणी, निहाल कांबळे,मंदार सावंत,अमोल जाधव,क्रीश शेलार,प्रतिमा कांबळे,समिक्षा बोरगे,राजश्री बोरगे,प्रणव चंद्र मोरे,मंथन सुर्यगंध आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांना संस्थेचा अहवाल देण्यात आला.शेवटी लहान मुलांना संस्थाच्या वतीने आकर्षक पेन देण्यात आले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती कार्यक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.