मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आर्वी येथे हेलिपॅडवर आगमन
वर्धा : आर्वी येथील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज आर्वी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावर, राजेश बकाने, सुमीत वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.