अमरावती : जनमित्र (वायरमन) कर्मचारी सचिन राऊत वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी मार्डी, दिवाखेड व चिखली ता. तिवसा येथील अनेक थकीत वीज बिल असलेल्या वीज ग्राहकांना वीज खंडित करण्याची धमकी देऊन थकीत वीज बिलाची रक्कम मागणी करून महावितरण कार्यालयात बिल न भरताच परस्पर खर्च केली आहे. व शासकीय निधी चा अपहार केला.
ग्रामीण भागात लोक हे कामाला जाणारे असल्यामुळे महावितरण कंपनीची वीज बिल वसुली हि सहसा वीजवितरण जनमित्र यांचे कडून प्रत्यक्ष वीज बिलाचे पैसे घेऊन केल्या जाते.
काही लोक वीज बिल सहजतेने भरतात तर काही लोकांना वीज बील जनमित्र वेळेत पैसे न भरल्यास लाईन (Disconnected ) कट करण्याची वार्निंग देतात एकंदर ग्रामीण भागात वीज वितरण कंपनी जनमित्र आणि वीज ग्राहक यांचेत सुसंवाद असतो.
परंतू याचाच फायदा घेऊन त्यावेळचे रहाटगाव शाखेचे जनमित्र (वायरमन ) सचिन राउत यांनी मार्डी,दिवानखेड आणि चिखली या गावातील गरीब लोकांचे पैसे लाईन कापून टाकतो अशी धमकी देऊन वीज बिल भरण्याच्या नावाखाली पैसे घेऊन त्यांचे पैसे वीज बिल न भरता परस्पर फसवणूक केली आहे. असे असताना त्यांनी शासकीय रकमेचा अपहार केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. व ज्या ग्राहकांच्या रकमेचा भरणा करणे बाकी आहे. ती रक्कम सचिन राऊत यांच्या वेतनातून कपात करण्यात यावी व ग्राहकांचे बिल भरण्याची व्यवस्था करण्यात यावी.
अशी तक्रार मुख्य अभियंता महावितरण, अमरावती विभाग अमरावती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी उपस्थित गाव सहेली महाराष्ट्र संचालिका मंगला भोगे, गावाकडची बातमी चे मुख्य संपादक देवेंद्र भोंडे,शोभा कौर दि. बावरी, दिपकसिंग बावरी उपस्थित होते.