क्रांतिवीरांचे विचार अंगीकारले पाहिजे- नंदिनीताई टारपे

क्रांतिवीरांचे विचार अंगीकारले पाहिजे-  नंदिनीताई टारपे

गिरोली येथे जागतिक महिला दिन साजरा..


         क्रांतिकारी सोमा डोमा आंध जयंती सोहळा


मानोरा : पश्चिम विदर्भ आंध आदिवासी महासंघ द्वारा आयोजित जागतिक महिला दिन व सोमा डोमा आंध जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मानोरा तालुक्यातील गिरोली कोलार येथील गोपाल मंगल कार्यालयात दिनांक ९ मार्च २०२५ रोज रविवारी ११.०० वाजता जागतिक महिला दिनाच्या अध्यक्षा सौ. नंदिनी टारपे, जेष्ठ समाजसेविका बुलढाणा हे होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शितलताई राजेश ढगे साहित्यीक तथा संस्थापक आदिवासी विचार मंच ( म.रा.) डॉ.ललीता ‌विठ्ठलराव पवार,बि.ए.एल.एल.बीएल.एल.एल.महीला

कायदेविषयक तज्ञ.हे होते.या महिला दिनाच्या 

आंध आदिवासी महिला संघटन सक्षमीकरण करणे,व सोमा डोमा आंध जयंती सोहळा आदिवासी सामाजिक दृष्ट्या प्रबोधन यासह अनेक विषयांवर समाज प्रबोधन करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



 सर्व उपस्थित महिलांना प्रमुख मार्गदर्शक शितलताई ढगे, कार्तिका ठाकरे , सौ. रेखाताई साखरे, ज्योतीताई करवते, वर्षा वाघमारे, मुक्ताताई ढोके, स्नेहा वाघमारे, ललीताताई पवार , नम्रता धनजकर, आश्विनी लोखंडे आदी महिलांनी आदिवासी महिलांना वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन केले व शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. नंदिनीताई टारपे यांनी आज रोजी महिलांचे सक्षमीकरण करून महिलांना संघर्षासाठी तयार करणे अत्यंत गरजेचे आहे.आदिवासी महिलांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत, हे जर थांबायचं असेल तर महिला संघटन करणे गरजेचे आहे, सोमा डोमा आंध या क्रांतिविरांचे विचार आपल्याला अंगीकरावे लागतील तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली याचे सार्थक होईल असे मत अध्यक्षीय भाषांनातून व्यक्त केले.

अशा प्रकारचे सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

प्रास्ताविक पुष्पाताई कळंबे यांनी केले पश्चिम विदर्भातील प्रथमच वाशिम जिल्ह्यातील तसेच मानोरा तालुक्यातील गिरोली कोलार येथे हजारो महिलांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला ढगे हे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. ठाकरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post