अत्यंत हालाकिच्या परिस्थितीत जिवन जगणाऱ्या राऊत कुटुंबाच्या घराला आग लागून जळुन सर्व नष्ट झाले असल्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी.


   अत्यंत हालाकिच्या परिस्थितीत जिवन जगणाऱ्या राऊत कुटुंबाच्या घराला आग लागून जळुन सर्व नष्ट झाले असल्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी.
भारतीय दलित पँथर ची मागणी


 जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर 


 दि.28 मार्च 2025 ला भारतीय दलित पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे  सुनंदा शिवदास राऊत वय 60, शिवदास जगतराव राऊत वय 63 रा.शिवणी खुर्द ता. भातुकली जि. अमरावती यांच्या राहते घराला दि 13,03,2025 रोजी सकाळी 3ते4 च्या दरम्यान आग लागल्या ने सर्व जळुन खाक झाले.

  त्यांच्या परीवारात दोघ नवराबायको एक मुलगी जिचे नाव निशा शिवदास राऊत जि 25 वर्षाची आहे व पाॅरॅलिस (लकवा) आजाराने त्रस्त आहे.व एक ५ वर्षाचा नातु मोजुन चार लोकं राहतात.

शिवदास राऊत हे अमरावतीला एका मालका कडे तीन हजार रुपये महीन्याने चौवकिदारीचे काम करतात.

१२ तारखेला सुनंदा शिवदास राऊत व तिची मुलगी निशा व पाच वर्षाचा नातू असे तिघे ही अमरावतीला आलें होतें वेळ झाल्याने ते ते अमरावतीत शिवदास राऊत कडे थांबले म्हणून जिवीत हानी झाली नाही.परंतु आगीत घरातील धान्य, कपडे,जिवनावश्यक वस्तू जळालेल्या आहे.त्यात त्यांचे सर्व शासकीय कागदपत्रे जळाले आहेत.त्यांचा परीवार उघड्यावर आला असून त्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नसुन या भागातील कोणताही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली नाही.राऊत यांचे कुटुंब भुमीहिन असुन मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असुन त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळने गरजेचे होते. परंतु असे झाले नाही म्हणून भारतीय दलित पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन राऊत परीवाराला आर्थिक मदत मिळावी म्हणून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळेस भारतीय दलित पँथर चे जिल्हा प्रमुख प्रविण पाटील, मनोज धुळेकर, अजय रामटेके, केशव गायकवाड, शिवदास राऊत, सुनंदा शिवदास राऊत हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post