अजय पवार यांच्या पाठपुराव्याने बसवली डीपी

 


आमदार भीमराव केराम यांच्या आदेशाने कार्यकर्ते लागले कामाला


श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे गुंडवळ येथे लोड शेडिंग सह विद्युत दाबाचा कमी पुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास होत होता अनेक दिवसापासून मागणी करूनही ट्रांसफार्मर बसविला नसल्याने नागरिकांनी पाचुंदा येथील रहिवासी असलेले भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अजय पवार यांचे कानी वार्ता टाकल्याने त्यांनी आमदार भीमराव केराम यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत महावितरणचे सहाय्यक अभियंता शेंडे यांच्या प्रयत्नातून ट्रांसफार्मर बसविल्याने नागरिकांनी अजय पवार यांची अभिनंदन केले आहे.



भारतीय जनता पार्टी किनवट माहूर चे आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता अजय भाऊ पवार हे नागरिकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी तत्पर राहत आहेत त्यामुळे नागरिक त्यांच्याकडे धाव घेऊन आपली कामे निपटवून घेत आहेत अनेक ठिकाणी विद्युत विभागाकडे पुरवठा पाठपुरावा करून विद्युत ट्रांसफार्मर बसवून घेतले असून नागरिकांच्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी ते रात्रंदिवस काम करत आहेत.

यावेळी भा.ज.पा चे तालुका उपाध्यक्ष अजय पवार अमोल भाऊ पाटील भा. ज. पा माहुर तालुका सरचिटणीस शेतकरी रामसिंग नाईक सुनील पवार शिवाजी सोनुने उकंडा बाई इंगळे फिरोज बेग अनंता कुंभारे रवी राऊत सखाराम चांदणे, शेख जिलानी यांचे सह कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post