भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम महिला विभागाच्या वतीने भव्य धम्मा उपासिका प्रशिक्षण शिबिरा चे आयोजन
नाशिक { प्रतिनिधी डॉ. शाम जाधव} आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृतिदिन,ते ७ फेब्रुवारी त्याग मूर्ती रमाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त,दि.२/२/२०२५ ते दि.१२/२/२०२५रोजी दुपारी ३ ते ५ असे दहा दिवसीय "धम्म महिला उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, संघमित्रा विहार,गोरेवाडी नाशिक येथे, नाशिक जिल्हा पश्चिम महिला विभागाच्या अध्यक्ष - सुरेखाताई बवै यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे, तरी या शिबिराचे उद्घाटन दि.२/२/२०२५ रोजी करण्यात आले त्यावेळी, नाशिक जिल्हा पश्चिम महिला विभागाच्या सरचिटणीस - मंगला वाघमारे, महिला विभागाच्या संघटक - सरिता जगताप तसेच नाशिक जिल्हा पश्चिम चे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय शिक्षिक, बौद्धाचार्य आद.एम.आर. गांगुर्डे गुरुजी, तसेच केंद्रीय शिक्षिक, बौद्धाचार्य गौरव पगारे गुरुजी, आणि संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा रमाबाई मनोहर गांगुर्डे तसेच संघमित्रा विहाराच्या सर्व धम्म उपासक, उपासिका ह्या सर्वांच्या उपस्थितीत "धम्म महिला उपासिका प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.