यहोवा यिरे फाऊंडेशन व कला जीवन बहुउद्देशीय संस्था व पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी सभागृह चिमूर जी.चंद्रपुर येथे रोजगार मार्गदर्शन मेळावा सांस्कृतिक ग्रुप डान्स व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्य वीरांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून चिमूर पोलीस स्टेशन च्या ठाणेदार दीप्ती मरकाम ह्या होत्या तर प्रमुख अतिथी सिने अभिनेत्री शिल्पा शाहीर विठ्ठल शिंदे संपादक अहमदनगर श्रीधर राजमने तहसीलदार चिमूर हे होते.
पाहुणे मंडळीच्या हस्ते जिव्हाळा कला संच चे प्रसिद्ध गायक आमचे मित्र सुनिल रामचंद्र चव्हाण रा.माळेगांव तह.आर्णी जी.यवतमाळ यांना सामाजिक कार्य व कला उद्योग रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.सुनिल चव्हाण यांनी स्त्री व पुरूष च्या आवाजात गीत गाऊन प्रेक्षकांना भारावून टाकले.कार्यक्रमाचे आयोजन डॉ रमेश बोरकुटे व युवराज ठाकरे यांनी केले तर सूत्रसंचालन मोनालिसा हिने केले . त्यांना भ्रमणध्वरीद्वारे गावाकडची बातमी चे नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे यांनी शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन यहोवा यिरें फाऊंडेशन च्या अध्यक्षा एलीजा बोरकुटे यांनी केले होते.


