विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
नांदेड,किनवट : सिंदगी मोहपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी गाव व तांडा व ग्रामपंचायत कार्यालय सिंदगी येथे ध्वजारोहण संपन्न 76 वा प्रजासत्ताक दिन सिंदगी मोहपूर तालुका किनवट येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी गावचे मुख्याध्यापक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय सिंदगी मोहपूर येथे गावचे प्रथम नागरिक परमेश्वर नारायण खोकले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सिंदगी गावातील तांडा येथे ध्वजारोहणासाठी शाळेतील विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्राथमिक उपकेंद्राचे कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी तांडा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित जाधव यांनी ध्वजारोहण केले.
या ध्वजारोहणाला पंचायत समिती माजी सदस्य प्रेमसिंग जाधव नाईक, पत्रकार गजानन वानखेडे नितीन वानखेडे गावचे पोलीस पाटील बालाजी वानखेडे (पाटील) आरोग्य कर्मचारी गावंडे , आरोग्य सेविका ज्योतीताई शिरोळे (मदनुरे), ग्रामपंचायत सदस्य रुपेश पाटील ज्ञानेश्वर सलामे ग्रामपंचायत सदस्य रमाबाई भिमराव धुपै, सामाजिक कार्यकर्ते पुरसिंग चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग नगारे, तंटामुक्ती अध्यक्ष नेरसिंग चव्हाण सिंदगी गावच्या ग्रामसेविका विजयमाला भगत, शामराव धुपे, पोटे सर ,धुमाळे सर , डुकरे सर, नागापुरे सर, व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
Tags : #प्रजासत्ताक_दिन_चिरायू_होवो