भिमक्रांती संघटने तर्फे गुंजन महिला बचत गटाच्या महिलांचा केला सत्कार.
अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी राजाभाऊ वानखडे
अमरावती: दिनांक 12 जानेवारी 2025 भिमक्रांती सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वराज्य जननी,राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख व आदिवासी जननायक जयपाल सिंग मुंडा यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या बडनेरा विधानसभेचे अध्यक्षा तथा गुंजन महिला बचत गट अध्यक्षा सुनिता सीरसाठ यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील स्मारक परिसर,अमरावती या ठिकाणी केले. याप्रसंगी सर्वप्रथम महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर संयुक्त जयंती निमित्ताने राजमाता,स्वराज्य जननी जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख व जयपाल सिंग मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करण्यात आले. यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर यांनी राष्ट्रमाता छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या विषयी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की राजमाता जिजाऊ माँ साहेब या अत्यंत विचारी,धीर गंभीर,त्यागी,निस्पृह, करारी व स्वाभिमानी होत्या.तसेच त्यांचे संघटन कौशल्य,लोक संग्राहक वृत्ती,समय सूचकता,चिकाटी,मत्सुद्दिपणा,दृढनिश्चय,सैनिकी डावपेचाचे ज्ञान आणि राजकारभारात जनतेची नाडी ओळखण्याचे नैपुण्यही त्यांच्यात होते. जिजाऊ देहाने स्त्री पण मूर्तीमंत पौरुषच होय. जिजाऊ ह्या वीरकन्या,वीरपत्नी,वीर माता व वीरस्त्री होत्या. विनय,प्रेम,कर्तव्य,दृढ निश्चय,त्याग आणि तपस्या याची मूर्ती म्हणजे जिजाऊ होत्या. संकट काळात अनेक यातना सहन करून,एका तपाहून जास्त काळ शहाजीराजे जिजाऊ पासून दूर होते तरी स्वतःचे चरित्र्य शुद्ध राखून अखेरपर्यंत पतीनिष्ठ राहिल्या, पतीच्या मृत्यूची बातमी कानी पडताच पतिविरह असह्य झाल्याने अग्नी प्रवेशाला त्या सिद्ध झाल्या.अलौकिक पतीनिष्ठेचे असे ज्वलंत उदाहरण दुसरे सापडणे नाही.म्हणून सर्व स्त्रियांनी जिजामातेचा आदर्श घेऊन आपल्या मुलींना जिजामातेचा इतिहास कथन करून त्यांना त्या पद्धतीने करारी व दाणेदार घडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा असे प्रतिपादन गोपालभाऊ ढेकेकर यांनी केले. यानंतर संघटनेच्या अमरावती शहराध्यक्षा विजया पिलावन यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मीना नागदिवे यांनी पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या कार्याविषयी माहिती दिली.त्यानंतर संघटनेच्या शिलेदार आयु.सुरेखाताई उईके यांनी आदिवासी नेते जयपाल सिंग मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.त्यानंतर भिमक्रांती सामाजिक संघटनेतर्फे वंश मते यांच्या हस्ते गुंजन महिला बचत गटाच्या अध्यक्षा व उपस्थित महिलांना पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
संघटनेच्या वतीने सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.अशाप्रकारे संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता शिरसाठ तर आभार प्रदर्शन विजया पिलावन यांनी केले. याप्रसंगी प्रामुख्याने भिमक्रांती सामाजिक संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सल्लागार व्ही.टी.तंतरपाळे, संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर, अमरावती कामगार जिल्हा अध्यक्ष सुमित गणवीर, संघटनेच्या बडनेरा वी.स. अध्यक्षा तथा गुंजन महिला बचत गट अध्यक्षा सुनीता शिरसाठ,शिला बोरकर,अमरावती शहराध्यक्षा विजया पिलावन,रमा शेळके,माया गाडगे,मोनिका तायडे,वैशाली काळे,सुवर्णा खांडेकर,मीना नागदिवे,वंश मते,राष्ट्रपाल घरडे व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.