अमरावती तालुका स्तरीय अधिकारी /कर्मचारी व लोकप्रतिनिधी आमदार राजेश वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा

 




 जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर

अमरावती  : आज दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी नवीन प्रशासकीय इमारत व तहसील कार्यालय अमरावती येथे अमरावती तालुका स्तरीय अधिकारी / कर्मचारी व लोकप्रतिनिधी ची आढावा सभा आमदार राजेश वानखडे तिवसा विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेमध्ये तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, कर्मचारी, जलसंधारण कर्मचारी व इतर वेगवेगळ्या खात्यातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे तालुक्यातील गावातील लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी पांदन रस्ता,पुनर्वसन समस्या अतिक्रमण समस्या, आवास योजना, वीजबिल समस्या व गावातीलइतर समस्या अधिकारी व कर्मचारी यांच्या समोर मांडल्या व त्याला अध्यक्षाच्या समोरासमोर त्यावर उपाय योजना सुचविण्यात आल्या व नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यात आले.यावेळी या आढावा सभेमध्ये मोठया संख्येने महिला वर्ग व तालुक्यातील नागरिक, शासकीय कर्मचारी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post