शहरा पोलीस ॲक्शन मोडवर ; वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई दणका...!

 



मूर्तिजापूर - शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी व चारचाकी, अशा विविध वाहनांवर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी तोलाराम चौकात अचानक नाकाबंदी करून कायदेशीर कारवाई केली, अशी माहिती मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजित जाधव यांनी दिली.

      गेल्या काही दिवसांपासून शहरातील घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे, अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्याकरिता खुद्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी कंबर कसली असल्याचे दिसत आहे. 

 शहरात दुचाकीस्वार चोरट्यांकडून सध्या रस्त्याहून ये-जा करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्याच्या, बंद सदनिकेतून ऐवज चोरून नेण्याच्या, तसेच मोटारसायकल चोरी अथवा घर फोडीच्या घटना वाढलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी वस्ती या मुख्य शहरातील रस्त्यावर तोलाराम चौकात स्वतः पोलीस निरीक्षक अजित जाधव व एक पोलिस अधिकारी व दहा अंमलदार यांच्या उपस्थितीत नाकाबंदी केली. वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट बसविणे, काळी काच, विना नंबर प्लेट वाहने, ट्रिपल सीट वाहतूक करणारे मोटरसायकलधारक, दारू पिऊन गाडी चालवणारे, वाहन चालवीतांना मोबाईल चा वापर करणारे, अल्पवयीन वाहन चालक अशा विविध कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नाकाबंदी करून कायदेशीर कारवाई केली.



यावेळी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शामसुंदर तायडे,पवन बोडखे,सचिन वैराळे,नंदकिशोर टिकार, वाहतूक विभागाचे सोळंके, नामदेव आडे आदी शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post