गावाकडची बातमी | दूषित पाणी पिल्याने दगावल्या सहा बकऱ्या

 

         नांदगाव पेठ येथील घटना 

               


गावाकडची बातमी,प्रतिनिधी प्रमोद घाटे

  नांदगाव पेठ येथील गोपालक अजय डोईफोडे तसेच प्रवीण डोईफोडे यांच्या मालकीच्या सहा बकऱ्या बोरगाव धर्माळे परिसरात चराई करून परत येत असताना टाटा मोटर्स सर्विस सेंटर च्या समोरील डबक्यामध्ये पाणी सेवन केल्यानंतर लगेच अनेक बकऱ्यांची प्रकृती खालावली तर चौपाल सागर समोर पंधरा मिनिटात सहा बकऱ्या दगावले दगावलेल्या बकऱ्यांच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला तर यावेळी अजय डोईफोडे व प्रवीण डोईफोडे यांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हटकर यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली तर पोलीस प्रशासनाने तात्काळ उपस्थिती दर्शवून पंचनामा तसेच माहिती संकलित केली तर यावेळी पाण्याचे नमुने सुद्धा घेण्यात आले.तर डॉक्टर हटकर यांनी तात्काळ स्पॉट पंचनामा करून गंभीर असलेल्या बकऱ्यांवर लगेच उपचार सुरु केला असल्याने उर्वरित बकऱ्यांना जीवदान मिळाले तर यावेळी मृत बकऱ्यांचे छविछेदन करण्यात आले. यावेळी एक लाख वीस हजाराच्या किमतीच्या सहा बकऱ्या दूषित पाण्याने दगावल्या असा प्राथमिक अंदाज अनेकांनी व्यक्त केला तर पाण्याचे नमुने तपासणी करता प्रयोगशाळेकडे रवाना करण्यात आले. याप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करीत आहे.



नुकसान भरपाई मिळावी -  प्रवीण डोईफोडे 

मजुरी व बकरी पालन करून आम्ही आमचा उदरनिनिर्वाह करीत आहे. मात्र टाटा सर्व्हिस सेंटर समोरील डबक्यात साचलेले पाणी पिल्याने आमच्या सहा बकऱ्या दगावल्या त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बकरी पालक प्रवीण डोईफोडे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post