शेतकरी लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडे किंवा तहसील कार्यालयात तात्काळ कागदपत्रे जमा करावेत
तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा आहे व तसेच ज्यांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून स्वस्त धान्य मिळत होते अशा लाभार्थ्यासाठी शासनाकडून कुटुंबातील महिलांना थेट लाभार्थी बनवून त्यांच्या खात्यात डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अन्नधान्यपोटी मिळणारी रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेशित केल्याने माहूर तालुक्यातील 1598 लाभार्थ्यांच्या खात्यावर 78 लाखावर रक्कम जमा करण्यात आली असून उर्वरित लाभार्थ्यांनी अनुदान जमा करण्यासाठी कागदपत्रे आपापल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे तात्काळ जमा करावी असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.
माहूर तालुक्यात शेतकरी लाभार्थी योजनेअंतर्गत 3414 एपीएल शेतकरी शिधापत्रिका असून एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत चे 78 लाख 75 हजार रुपये महिला कुटुंबप्रमुखांच्या खात्यात जमा करण्यात आले असून 2024 चे अनुदान येणे बाकीच आहे त्यामुळे शेतकरी लाभार्थ्यासाठी डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे महिला कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंब प्रमुखाचे नावे तात्काळ अनुदान जमा करण्यात येत असून शेतकरी लाभार्थ्यांनी तात्काळ आपापल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे राशन कार्ड सर्वांचे आधार कार्ड महिला कुटुंब प्रमुखाचे पासबुक झेरॉक्स प्रतीत मोबाईल नंबर सह जमा करावयाचे आहेत
शासनाने जाहीर करताच अनेक दिवसांपूर्वीच अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असूनही अनेक शेतकऱ्यांनी आपापली कागदपत्रे जमा केली नसल्याने अनुदान वाटपात अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ कागदपत्रे आपापल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे किंवा तहसील कार्यालयात जमा करावी असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे यावेळी पुरवठा निरिक्षण अधिकारी निलेश राऊत, पुरवठा निरीक्षक गजेंद्र मिरजगावे, लिपिक संतोष पहुरकर ,गोदाम व्यवस्थापक मिलिंद वाठोरे, लिपिक वैभव पांढरे उदय वानखेडे यांचे सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.