मूर्तिजापूर - तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लाखपुरी शिवारातील शेत रस्त्याच्या वादावरून सख्या भावाने ६० वर्षीय भावाला हमरीतुमरी करीत डोक्यावर विळ्याने प्रहार करून जखमी केल्याची घटना २०डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणाची फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तालुक्यातील लाखपुरी येथील शेतकरी श्रीकृष्ण सूर्यभान चारथळ वय ६० वर्षे यांचे शिवारात ९ एकर शेती आहे . त्यांचा भाऊ बाळकृष्ण सूर्यभान चारथळ यांचे ८ एकर शेत आहे .मात्र शेताच्या रस्त्यावरुन बाळकृष्ण याने वादविवाद करत जवळच्या विळ्याने डोक्यावर प्रहार करून जखमी केले . हरभरा पिकांवर फवारणीसाठी कामावरील मजूर मंगेश अवघड व नंदू याने त्याच्या हातातील विळा हिसकावून जखमी श्रीकृष्ण याला मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले .
याप्रकरणाची फिर्याद ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यावरून आरोपी बाळकृष्ण चारथळ याच्या विरुद्ध बीएनएस कलम ११८(१) ,३५२,३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद नवलकार हे करीत आहे.