ग्रामपंचायत कार्यालय सिंदगी मोहपूरच्या उपसरपंच पदी ललिता जाधव (नाईक) यांची निवड
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
ग्रामपंचायत कार्यालय सिंदगी मोहपुर उप सरपंच पदाची निवड आज दिनांक - 2 12-२४ ला ग्रामपंचायत कार्यालय शिंदगी येते संपन्न झाली.
या निवडीच्या अध्यक्षपदी शिंदगीचे प्रथम नागरिक सरपंच परमेश्वर नारायण खोकले होते या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कार्यालय सिंदगी चे सर्व सन्माननीय सदस्य सदस्या या उपस्थित होते सुरुवातीला महापुरुषाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व एकमताने ललिता प्रेमसिंग जाधव नाईक यांची निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य रुपेश मनोहर पाटील अनुसया परमेश्वर खोकले, रमाबाई भीमराव धुपे, ज्ञानेश्वर सलामे, माजी उपसरपंच दत्ताजी चिकणे पेशा समितीचे अध्यक्ष खोकले, तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य सलामे गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश जाधव, नाईक पुरसिंग चव्हाण, अशोक खोकले सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिरडकर माजी पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग जाधव नाईक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्रामसेविका विजयमाला भगत या उपस्थित होत्या..