अमरावती : दिनांक 1/12/2024 ला प्रमिला ई निवास जलाराम कॉलनी दस्तुर नगर येथे युवाशक्ती ग्रामविकास संगठन महाराष्ट्र राज्या चे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी चे सचिव पुरुषोत्तम सदार, कोषाध्यक्ष रामेश्वर सुलताने, सदस्य सुधिर लाडझरे उपस्थित होते कार्यक्रमांची सुरूवात रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
युवाशक्ती ग्रामविकास संगठन च्या संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत च्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले व अमरावती जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अमरावती जिल्हा अध्यक्ष पदी प्रमोद घाटे, जिल्हा संघटक पदी संतोष भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष पदी स्वप्निल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष पदी पवण पाटणकर, जिल्हा सचिव पदी देवेंद्र भोंडे, जिल्हा सहसचिव आकाश शेंडे, जिल्हा सहकोषाध्यक्ष पदी आनंद मेहरे, जिल्हा जनजागृती अभियान प्रमुख पदी विशाल गुल्हाणे, जिल्हा नियोजन प्रमुख पदी निलेश गजभिये,चांदुर बाजार तालुका पदी तुषार खडके यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नवनियुक्त पदाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण व मुख्य कार्यकारी च्या वतिने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच नवनियुक्त अमरावती जिल्हा पदाधिकाऱ्यांनी संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रशांत साकरकर सह कार्यकर्ते उपस्थित होते.