आपण आज आमच्यात नाही, परंतु आपण नेहमी आमच्या आठवणीत राहाल. बाबा तुमच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन.
माझे वडील खूप छान होते ते अजूनही माझ्या आठवणीत जीवनात जिवंत आहेत, मी तुमच्या पुण्यतिथी निमित्त स्मरण करतो.
जगातील सर्वोत्कृष्ट बाबाच्या चरणी माझे शतकोटी नमन.
बाबा,आपण आमच्यात नसू शकता परंतु आम्हाला खात्री आहे की तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या बरोबर आहेत.
आम्हाला माहित आहे की जाणारे कधीच परत येत नाहीत परंतु त्यांच्या आठवणी कायम हृदयात राहतात.
बाबा म्हणजे आयुष्यातील बाप माणूस असतो जो न दाखवता आपल्या कुटुंबावर आभाळभर प्रेम करतो. बाबा तुमच्या कट्टर शब्दामागे मायेचा झरा लपला होता, तुमच्या प्रत्येक घामाच्या थेंबामागे आमच्या भविष्यातील आलेख लपला होता.
बाबा तुम्ही मला आयुष्यात सर्व काही दिल पण तुमच्याशिवाय कसं जगायचं हेच नाही शिकवलं.
माझी ओळख आहे ती तुमच्यामुळेच मी आज या जगात आहे ते फक्त तुमच्यामुळेच.
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईची माया आणि वडिलांचे प्रेम कितीही रुपये खर्च केले तरी ते मिळू शकत नाही.
बाबाच्या कर्तुत्वाला आणि कष्टाला या जगात जोडच नाही
-: शोकाकुल :-
गजानन रामराव वानखेडे व
सर्व वानखेडे परिवार
शिंदगी (मो) तालुका किनवट,
जि. नांदेड