मूर्तिजापूर - आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व दिवाळी सणाच्या निमित्ताने ग्रामीण पोलिसांचा पोलीस स्टेशन हद्दीतील गावात रूट मार्च घेण्यात आला.
दिनांक १ नोव्हेंबर रोजी ग्रामिण पोलीस स्टेशन मूर्तिजापूर हद्दीत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महत्त्वाचे गावात ग्राम लाखपुरी व हिरपूर या गावामध्ये रूट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात व ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गट्टे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला यामध्ये पोलिस स्टेशनचे २ पोलीस अधिकारी १४ अंमलदार व बिएसएफ जवान हजर होते.