शेतकऱ्यांचे सोयाबीन रानावरच भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान... #गावाकडची बातमी

 



लातूर,उदगीर, उत्तम माने:  गुरुवारी दुपारी दीड वाजता अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन रानावर काढून टाकलेले होते.

  काढणीचे काम सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन रानावरच भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. नंतर सरीवर सरी पाऊस पडतच होता पुन्हा राञी पासून पडण्यासाठी आभाळात वातावरण निर्माण झाले‌. असून या पावसाने सोयाबीन रानावरच फुगून सडून जाण्याची शेतकऱ्यांना मोठी भिती आहे.

        सरकार,नेते येणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या तयारीत आहेत, शेतकऱ्यांना मजूर वेळेवर मिळत नाहीत, मिळाले तर पैसे दुप्पटीने द्यावे लागत आहे, दुसरीकडे पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही, बाजारात भाव नाही आशा अवस्थेत शेतकऱ्यांनी काय करावे,सरकार दररोज भरगच्च निर्णय घेत आहे.

   पण शेतकऱ्यांची कर्ज माफी करायचा निर्णय घेणे विसरून जात आहे.

दुसरी कडे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर पणे उभा आहे हे मोठ्या आवाजात सांगत आहेत.सरकारने कर्ज माफी ची आशा दाखवून बॅकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर हजारो रुपयेचा बोजा चढवून ठेवला आहे.

 त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, तुम्हाला खरच शेतकऱ्यांच हित करायचे असेल तर एकदाच सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post