निंभोरा बोडखा येथे काँग्रेस पक्षाला मोठा झटका...

 



धामणगाव प्रतिनिधी /अजय डाखोरे


धामणगाव रेल्वे : धामणगाव तालुक्यात निंभोरा बोरखा येथील भारतीय काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये खुलेआम प्रवेश केला लोकप्रिय आमदार प्रताप अडसड यांनी केलेल्या सर्वांगीण विकासावर तसेच कोणताही जातीभेद न करता राजकारण न करता सर्वसामान्यांच्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा गोरगरिबाच्या गोरगरिबांच्या साठी झटणारा असा आधार स्तंभ असलेला नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांनी प्रताप अडसड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये खुल्याम प्रवेश केला.

 निखिल घीये, साहेबरावजी वाट ,अभिजीत कोरडे, राजू चौधरी, हरीश पांडे, सतीश दाभाडे, संजय ढोले ,संदेश ढोले, सुधीर सजावटते, रवींद्र सरटे तसेच प्रहार पक्षाचे नेतृत्व असलेले निलेश लावणे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मान जनक प्रवेश देण्यात आला.

      यावेळी धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे तालुका अध्यक्ष मनोज डहाके देवगाव जिल्हा परिषद सर्कल मनोज धंदे, निलेश चावरे, भूषण राठी वाघोली येथील माजी सरपंच विजय गायकवाड अशोक राऊत चव्हाण बबलू बिरे रवी बिरे असे अनेक कार्यकर्ते कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post