मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
महाराष्ट्र राज्य लाॅटरी विभागाच्या भव्यतम दिवाळी बक्षिसांच्या सोबतच विक्रेत्यांचीही दिवाळी होणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य लाॅटरी संघटना लाॅटरी विक्रेत्यांसाठी राबविणार आहे.उभ्या देशभरात पारदर्शक प्रतिष्ठित आणि गौरवशाली परंपरा असलेल्या दिवाळी भव्यतम सोडतीचे ग्राहक तसेच विक्रेते यांच्यात आकर्षण आहे. लाॅटरी विक्रेता संघटनेतर्फे विक्रमी विक्री होण्यासाठी यंदा ही अभिनव योजना हाती घेण्यात आली. २५तिकीटांची खरेदी करणा-या विक्रेत्यांना (एजंट) आकर्षक रोख बक्षिसे असणारे कुपन भेट मिळणार आहे.जाहीर झालेल्या सोडतीच्या निकलावर या बक्षिसांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.या कुपनातून पहिले बक्षिस ५०हजार (१० हजारांची ५ बक्षिसे) निकालाच्या चौथ्या बक्षिसावर, दुसरे बक्षिस ५०हजारांची (५हजारांची १०बक्षिसे) निकालाच्या पाचव्या बक्षिसावर, तिसरे बक्षिस २०हजार (२हजारांची१०बक्षिसे) निकालाच्या सहाव्या बक्षिसावर, चौथे बक्षिस १०हजारांची (१हजाराची १०बक्षिसे) निकालाच्या सातव्या बक्षिसावर अशी या बक्षिसांची रचना आहे.या संदर्भात अधिक माहितीसाठी विक्रेत्यांनी संघटनेच्या पदाधिका-यांची संपर्क साधावा अशी माहिती संघटनेने दिली आहे.