जागतिक फार्मासिस्ट दिवस



जागतिक स्तरावर आरोग्य सेवा सुधारण्यासाठी फार्मासिस्टचे योगदान अधोरेखित करणाऱ्या उपक्रमांना समर्थन देण्यासाठी तसेच तळागाळातील फार्मासिस्टचा सन्मान वाढवण्यासाठी ‘25 सप्टेंबर’हा दिवस “जागतिक फार्मासिस्ट दिवस”म्हणून दरवर्षी मोठ्या थाटामाटात सर्व फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, फार्मसी कॉलेज तसेच फार्मसी क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व संस्था,आरोग्य संस्था,येथे साजरा केला जातो.या दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनतर्फे दरवर्षी एक नवीन घोषवाक्य तयार केले जाते या वर्षी 2024 चे घोषवाक्य “फार्मासिस्ट जागतिक आरोग्य गरजा पूर्ण करणारे”आहेत. असे निवडले आहे या घोषवाक्यानुसार संपूर्ण जगातील फार्मसी क्षेत्रातील फार्मासिस्ट अधिक जोमाने,उस्फुर्तपणे जनतेचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व फार्मूला वापरून नवनवीन औषधे बाजारात आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहतील फार्मासिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्या मधील दुवा आहे त्याला आरोग्याचा कणा असे म्हटले जाते त्यामुळे आज आरोग्य क्षेत्रात फार्मासिस्टला विशेष महत्व आहे आज वाढती लोकसंख्या,दररोज घडणारे विविध अपघात, चिकनगुनिया,करोना सारखे नवनवीन साथीचे आजार,ताण तणावातून निर्माण होणारे बीपी, शुगर,हार्ट अटॅक,मानसिक आजार,वारंवार घडणारे नैसर्गिक आघात इत्यादी सर्व बाबी मानवावर विपरीत परिणाम होऊन गंभीर आजार निर्माण करणारे आहेत त्यामुळे सर्व जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी औषध हाच एकमेव पर्याय असल्याने फार्मसी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व मानव व प्राणीमात्रांना औषधांची नितांत गरज आहे. गोरगरीब जनतेला औषधी मिळावी,याकरीता शासनाने वेगवेगळ्या योजना राबवून कुष्ठरोग, क्षयरोग,एड्स,सिकल सेल,मानसिक रोग, बीपी,शुगर इत्यादी आजारांवर तसेच गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला सर्व शासकीय रुग्णालयात मोफत औषधे उपलब्ध करून दिली व त्या औषधांचे योग्य ते नियोजन करणे व ती औषधी तळागाळात रुग्णांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या फार्मासिस्ट मित्रांवर सोपवली आमचे सहकारी मित्र आपले गाव,शहर परिवार सोडून ती जबाबदारी नित्यपणे पार पाडीत आहे आज आरोग्य सेवे मध्ये औषधांचे महत्व लक्षात घेता स्वतंत्र औषध संचालनालय होणे ही काळाची गरज आहे

सर्व फार्मासिस्ट बंधू भगिनींना“जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या”हार्दिक शुभेच्छा




सतीश देविदास माहुरे

मुख्य औषध निर्माण अधिकारी

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती


Tag : #जागतिक फार्मासिस्ट दिवस #GavakadachiBatmi #Marathibatmi #गावाकडचीबातमी #सतिशमाहुरे 

Post a Comment

Previous Post Next Post