परमेश्वराची मंजुळ स्वरात आळवणी करणाऱ्या विविध गावातील भजनी मंडळातील महिला भगिनींना रक्षाबंधनानिमित्त प्रकाश साबळे मित्र मंडळाच्या वतीने धार्मिक दिंडीमध्ये परिधान करणाऱ्या पिवळ्या रंगाच्या साड्या( ड्रेस कोड ) प्रदान....

 दरवर्षीप्रमाणे विविध गावामध्ये रक्षाबंधनानिमित्त दि.19/8/24 रोजी भजनी मंडळातील महिला भगिनीस युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभहस्ते साड्या प्रदान

⭐ लाडक्या बहिणींनी आपल्या दोन चाकी वाहनधारक असलेल्या प्रिय भावास रक्षाबंधन असो की भाऊबीज या सणाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटची अमूल्य भेट द्यावी - प्रकाश साबळे यांचे सर्वांना भावनिक आवाहन.

 महिला भगिनींनी माननीय प्रकाश साबळे व उपस्थित मान्यवरांचे औक्षवान करून राख्या बांधल्या व महिला सुरक्षेचे अभिवचन घेतले.

    याप्रसंगी विविध गावातील मान्यवर मंडळी तसेच माजी सरपंच मिलिंद जवंजाळ, सरपंच लताताई जवंजाळ, माजी सरपंच संगीता जवंजाळ, संजयराव महल्ले, अक्षय साबळे, गजानन इसळ, प्रमोद राव जवंजाळ, अरुण जवंजाळ, सुधीर पडोळे, उपसरपंच मोहन महल्ले, रवि जवंजाळ, प्रफुल्ल जवंजाळ,अक्षय सरोदे,किरण इंगोले आदी प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post