पुणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य घेऊन विद्यापीठ आज महाराष्ट्रातील कानाकोप-यात विविध अभ्यासक्रम राबवुन शैक्षणिक संधी उपलब्ध करून देत आहे.विद्यापीठ नेहमीच विद्यार्थ्यांना गरजेनुरुप अभ्यासक्रम देण्यासाठी प्रयत्नशील आहे.२०२४-२५या शैक्षणिक वर्षात विद्यापिठाने अनेक नवीन अभ्यासक्रम सुरु केले त्यात परिवहन व्यवस्थापन पदविका व वसतिगृह व्यवस्थापन पदविका हे दोन महत्वाचे अभ्यासक्रम आहेत.हे दोन्ही अभ्यासक्रम ओम ग्रामण्ये इन्स्टिट्यूट फाॅर एज्युकेशनल एक्सलन्स,न-हे रोड,धायरीफाटा,पुणे४१,अभ्यासकेंद्र क्र.६२५५३येथे सुरु होत आहे.शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी वसतिगृह महत्वाची भूमिका पार पाडतात.वसतिगृहात विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते.त्यामुळे वसतिगृह हा विद्यार्थ्यांचा आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे.दैनंदिन कामकाजाबरोबर या ठीकाणी विद्यार्थ्यांना योगा,संस्कार,विवेक यांचे धडे देणे,चांगला अभ्यास करण्यासाठी वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे.त्यामुळे वसतिगृहात काम करण्यासाठी कुशल व्यवस्थापक असणे गरजेचे आहे.विद्यापीठाने सुरु केलेल्या या अभ्यासक्रमुळे वसिगृहाचे व्यवस्थापनात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.कोणत्याही शाखेचा पदवीधर,एम.एस.डब्लू झालेले विद्यार्थी वा वसतिगृहात कार्यरत कर्मचारी,मेटर्न्स व वसतिगृहात काम करण्यासाठी उत्सुक उमेदवार या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.शाळा,महाविद्यालय,शासकीय,निमशासकीय व सामाजिक संस्थांनी पाठविलेल्या उमेदवारांना प्राधान्य क्रमाने प्रवेश दिला जाणार आहे.परिवहन सेवेत व्यवस्थापक म्हणून काम करण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज आहे.रस्ते वाहतूक व्यवस्थापकाची भूमिका बहुआयामी असते.ज्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या कार्यक्षम हालचालीसाठी महत्वाच्या जबाबदा-यांचा समावेश आहे.रस्ते वाहतूक व्यवस्थापक हे रस्त्यांद्वारे मालाच्या वहातूकीवर देखरेख करण्यासाठी,ऑपरेशन सुरळीतपणे,सुरक्षितपणे आणि नियमांचे पालन करत असलेल्याची खात्री करण्यासाठी जबाबदार असतात.त्यांची भूमिका केवळ ड्रायव्हींग पूरती मर्यादित नसते. यामध्ये संपूर्ण वाहतूक प्रक्रिया राबविण्यासाठी धोरणात्मक नियोजन,समन्वय आणि संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन इत्यादि समाविष्ट आहेत या सर्व बाबींचा समावेश करुन परिवहन व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम तयार झालेला आहे.परिवहन सेवेतील प्रशिक्षित व्यवस्थापक उपलब्ध झाल्यास परिवहन सेवेचा दर्जा उंचावेल.प्रवाशांना चांगली सेवा मिळेल.प्रवाशांना चांगली सेवा मिळाल्यास ते खाजगी वाहने वापरणार नाहीत.त्यामुळे प्रदुषण कमी व वातावरण शुद्ध राहण्यास मदत होईल.विद्यापीठाने सुरु केलेला हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो.तसेच डिप्लोमा धारक उमेदवारांना२वर्ष कामाचा अनुभव असल्यास त्यांनाही प्रवेश घेता येईल.एखाद्या संस्थेने नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांसाठी शिक्षणाची अट शिथिल करण्यात येईल व त्याला प्राधान्यक्रमाने अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाईल.हे दोन्ही अभ्यासक्रम लोकांना चांगल्या सेवा मिळाव्यात यासाठी डिझाईन केलेले आहेत.
या अभ्यासक्रमाची महाराष्ट्रातील सर्व भागात माहिती झाल्यास जास्तीत जास्त उमेदवार या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील.व या दोन्ही सेवा सर्व स्तरातील लोकांना दर्जेदार मिळतील व या सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल अशी माहिती ओम ग्रामणै इन्स्टिट्यूट फाॅर एज्युकेशनल एक्सलन्सचे संचालक शिवराम चव्हाण यांनी दिली.