अनेकदा तक्रार दाखल करुन सुध्दा आतापर्यंत तक्रारीचे निराकरण नाही. तसेच नविन पाण्याची पाईपलाईन तात्काळ सुरु करावी..भीम ब्रिगेड

 



लोकमाता इंदिरा गांधी नगर (यंकय्यापुरा) येथे गेल्या १ वर्षापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे आपल्या कार्यालयामध्ये अनेकदा येऊन तक्रार दाखल केली असुन सुध्दा आतापर्यंत तक्रारीचे निराकरण केले नाही. तसेच नविन पाण्याची पाईपलाईन तात्काळ सुरु करावी भीम ब्रिगेड संघटनेची मागणी



Amaravati , गावाकडची बातमी: यंकय्यापुरा ही बहुजन वस्ती असल्यामुळे याठिकाणी सर्व मजुर वर्ग आहे. यंकय्यापुरा येथे गेल्या १ ते दिड वर्षापासून पिण्याच्या पाण्याचे अतिशय अडचण सुरु असल्यामुळे आपल्या कार्यालयात यंकय्यापुरा येथील रहिवासी अनेकदा येवून आपल्याला तक्रार केली असुन सुध्दा आपण त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. 

यंकय्यापुरा येथे रात्री १ वाजता नळ येतात व ४ वाजता बंद करण्यात येतात. त्यामुळे मजुर वर्गाची अतिशय हयगय होत आहे. 

मात्र इतर कॉलनीमध्ये ज्या ठिकाणी व्हि.आय.पी. लोक रहिवासी आहेत त्याठिकाणी सकाळी ६ ते १० पर्यंत नळ चालु असतात. मात्र स्लम एरियामध्ये नळ सकाळी न सोडता रात्री सोडण्यात येतात. यंकयापुरा येथे सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग हे आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी सकाळीच ७ वाजता दैनंदिन कामावर जाण्यासाठी त्यांची लगभग असते. अशा

परिस्थितीमध्ये रात्री १ वाजता नळ येतात व सकाळी ४ वाजता बंद करण्यात येतात. त्यामजुरांना पाणी भरण्यासाठी रात्रभर डोळे फोडावे लागतात त्यातही पाईप लाईनला फोर्स नसल्यामुळे नळाची धार एकदम हळूहळू असते त्यामुळे त्या दोन तासात पुर्ण पाणी भरणे अशक्य होत.

यंकय्यापुरा येथे तात्काळ दोन दिवसाच्या आत मध्ये नविन पाईपलाईन जी आहे ती तात्काळ सुरु करण्यात यावी अशी आपणास विंनती आहे. जेणेकरुन सर्व मजुर वर्गाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल अशी आपणास विनंती आहे.

असे न झाल्यास आपल्या कार्यालया समोर ४ दिवसानंतर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भीम ब्रिगेड संघटनेकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे..

Post a Comment

Previous Post Next Post