अमरावती :- (३१ मार्च २०२४): रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आणि इंदू मिल स्मारक लढ्याचे नायक असलेले विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मा.आनंदराज आंबेडकर साहेब हे अमरावती येथे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरत आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत भिमक्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर यांनी श्रद्धेय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीला आज सक्रीय पाठिंबा जाहीर केला.सोबतच भिमक्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिलेदार यांना जिल्ह्यातील बुद्ध विहार समित्या,महिला बचत गट,पुरुष बचत गट, सामाजिक संस्था,जयंती उत्सव मंडळ यांना सोबत घेऊन ताकतीने प्रचार कार्याला लागा असा आदेश दिला आहे.
आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीच्या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांनीही पाठिंबा देवून लोकसभेत निवडून पाठवावे असे आवाहन गोपालभाऊ ढेकेकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
येत्या मंगळवारी २ एप्रिल २०२४ रोजी आनंदराज आंबेडकर हे अमरावती येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर आपण स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या प्रचार सभासाठी अमरावती मतदारसंघात जाणार आहोत,अशी माहिती त्यांनी पत्रकात दिली आहे.