धामणगाव रेल्वे - सुरज वानखडे
आजच्या युगात सगळीकडे मोबाईलचा वापर अतिशय जास्त प्रमाणात होत आहे, त्याचे फायदे अतिशय कमी आणि नुकसान मोठ्याप्रमाणात होताना दिसत असून समाजातील युवा पिढी व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीकडे भरकटत आहे. त्यामुळे समाजातील लोकांना बाबासाहेबांच्या विचारांचा विसर होत चालला असून लोकांचा कलह दुसरीकडे वळत चालेला आहे. आज समाजाला बाबासाहेबाच्या विचाराची गरज आहे ते विचार आपण सर्वापुढे मांडण्याची गरज आहे. बाबासाहेबांचे कार्य त्यांचा संघर्ष लोकापर्यत पोहचविण्याचे काम आपण केले पाहीजे या उद्देश्याने भीमरत्न युवा प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभेच्या च्या वतीने "परिवर्तन पहाट" या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन येत्या २१ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता पासून दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला पुज्ज भदन्त सारीपुत्त ( अकोला ), जगदीश गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जम्मू काश्मीर, भीमराव कांबळे राष्ट्रीय सचिव भारतीय बौद्ध महासभा तेलंगणा, राहुल गायकवाड तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा धामणगाव रेल्वे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणासाठी समता सैनिक दलाची मानवंदना, व्याख्याते व विद्रोही कवी गोविंद पोलाड, गायक अजय डेहाळे, संविधान मनोहरे, मनस्वी खडसे, अँकर प्रणोती मडावी, रिलस्टार खतरनाक सुमित, प्रतीक सोनटक्के, भाविक वागळे, साक्षी चिंचखेड, बा भीमा ढोल ताशा पथक, रॅप टोली, ए. के डान्स ग्रुप, आर. एस प्रो साउंड, बीट रॅपर सह अनेक प्रसिद्ध व्यक्तीची उपस्थिती राहणार आहे.
भीमरत्न युवा प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दल यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक धामणगाव रेल्वे येथे सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.