पनवेल(गुरुनाथ तिरपणकर)-खांदा काॅलनी सेक्टर नं.१येथे श्री साई भक्त सेवा नवरात्रोत्सव मंडळ कार्यरत आहे.मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात काळात पुजा-आर्चा,देवीची आरती,भजन,रासगरबा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले गेले.या नवरात्रोत्सवात महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.याप्रसंगी श्री.साई भक्त सेवा नवरात्रोत्सव मंडळाच्या नऊ कर्तृत्ववान महीलांचा जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने"नवदुर्गा सन्मानपत्र"सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे सहचिटणीस सौरभ टकले यांनी संस्थेची माहिती उपस्थितांना सांगितली.
यावेळी अर्चना क्षीरसागर,अश्विनी जोगदंड,नम्रता जाधव,शैलजा बंडगर,वैशाली पाटील,अर्चना जंगम,प्रतिमा म्हात्रे,गिता म्हात्रे या नऊ कर्तृत्ववान महीलांचा संस्थचे सहचिटणीस सौरभ टकले व त्यांच्या मातोश्री संगीता टकले यांच्या हस्ते"नवदुर्गा सन्मानपत्र"प्रदान करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साई भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष किरण घरत,उपाध्यक्ष प्रितम घरत,सचिव जिवराज परब,आतिष सांबरे,निरज बंडगर,सागर गंगणे,चैतन्य घरत,मयुर जोगदंड,निलेश चव्हाण,मयुर जोगदंड,निलेश चव्हाण,मयुर भुजबळ,संतोष देरे,भुषण घरत,निरज घरत,राजेश करडे,अक्षय गायकवाड,अद्वेत पोळ,आकाश जोगदंड,कल्पेश फडतरे,कपिल फडतरे,प्रकाश पाटील,रोहित तांबे,चेतन जोशी,दिपक खटाळे,विशाल लांडे,किरण लांडे,परशुराम देरे व इतर कार्यकर्ते व सेक्टर नं.१मधील रहिवाशांनी परिश्रम घेतले.