करोडो रुपयाच्या कामात निकृष्ठ साहित्याचा बांधकामात वापर
नागरिकांची ग्रा प ला बांधकाम थांबवण्याचे साकळे , मात्र नेरी ग्रा प चे साफ दुर्लक्ष
चंद्रपूर/ चिमूर, सुनिल कोसे : चिमूर तालुक्यातील नेरी हे मोठे गाव असून दाट लोकवस्ती चा आणि लोकसंख्या चा गाव आहे मात्र पाण्याच्या साधनाने परिपूर्ण नसल्याने पिण्याची पाण्याची टंचाई नेहमीच निर्माण होत असते बाजार चौकातील जुनी पाण्याची टाकी ही पडक्या अवस्थेत असल्याने बंद करण्यात आली.
त्यामुळे उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत येथे मागणी केली असता ग्रा प नी पाणीपुरवठा योजना साठी मागणी केली असता शासनाने निधी उपलब्ध करून देत करोडो रुपयांची जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा मंजूर करून जुन्या पाण्याच्या टाकीजवळ नवीन पाण्याच्या टाकीच्या कामाला सुरुवात झाली परंतु टाकीचे काम हे निकृष्ठ दर्जाचे असून या बांधकामात निकृष्ठ साहित्याचा वापर केला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे..
तसेच हा काम अंदाजपत्रक नुसार होत नसून मनमानी प्रकारचा होत असून संपूर्ण काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे ग्रामपंचायतीला माहिती देऊनही त्यांचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे कोणीही पदाधिकारी सद्स कामावर येऊन पाहिले सुद्धा नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे .
तेव्हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन बांधकाम ठेकेदारावर कारवाई करावी तसेच संपूर्ण बांधकामाची तपासणी करून परत दुसऱ्यानंदा काम सुरू करावे अन्यथा बांधकाम निकृष्ट दर्जाचे होऊन टाकी ही टिकणार नाही तेव्हा तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल न घेतल्यास नागरिक स्वतः कायदा हातात घेऊन मोठा जन आक्रोश आंदोलन करतील असा इशारा माणिक नगराळे , रुस्तम खा पठाण , बशीर शेख, व नागरिकांनी दिला आहे.