" उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग !!
मराठवाडा संपादक ,उत्तम माने
लातुर: -जिल्हा परिषद,पंचायत समितीचा कार्यकाळ संपून जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही निवडणुका जाहीर झाल्या नाही.सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचे चित्र पाहून लवकरच जि.प.पं.स.च्या निवडणुका Elections of G.P.P.S लागतील असे अंदाज काही राजकीय नेते बांधत आहे.तिकीट मिळावी यासाठी काही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने वरिष्ठांकडे गुप्तपणे फिल्डिंग Fielding लावल्याची चर्चा आहे.सध्या परिस्थितीचा विचार केला तर निवडणुकीचा रणसंग्राम शांत आहे. केवळ निवडणुकीला हिरवी झेंडीची प्रतिक्षा आहे.असे असताना मात्र काही अतिउत्साही तथाकथित नेत्यांना आता पासूनच जि.प.चे डोहाळे लागल्याचे दिसत आहे.विवीध माध्यमातून प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष लोकांच्या भेटीगाठींची मालिका सुरू केल्याचे चित्र असून या मंडळींची गतीवीधी लक्षात घेतली तर,जणू पक्षाने आतापासूनच यांना तिकीट दिले की काय ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.काही भावी उमेदवारांनी तर चक्क आपले क्षेत्र सोडून दुसर्या क्षेत्रात निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे.असे असेल तर ज्यांनी पूर्वीपासून स्थानिक पातळीवर पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली,वेळप्रसंगी लोकांच्या अडीअडचणीला धावून जात मदत केली.अशा नेत्यांचे काय ? वास्तविक पाहता टिकीटाचे खरे हकदार तेच आहे.यांना आपल्या क्षेत्रात दुसऱ्याची घुसखोरी पचणी पडेल का ? यांना डावलून इतर ठिकाणच्या नवख्याला तिकीट देणे पक्षाला परवडणारे ठरेल का? हाच मोठा प्रश्न आहे.
दुसरीकडे काही अतिउत्साही नेते निवडणूक जिंकण्याच्या अविर्भावात आपण राहतो कुठे आणि तिकीट मागतो कुठले ! याचेही त्यांना भान राहिलेले दिसत नाही.निवडक काही चेले-चपाट्यांना दारू,हॉटेलचे जेवण व काही पैसे खर्चाला देऊन मागे फिरवत पक्षश्रेष्ठींना आपले वजन दाखवत तिकीट घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.जर पक्षाने तिकीट नाकारली तर पुर्वी ज्या पक्षासोबत ज्यांच्या बैठका झाल्या,पक्षांतराची तयारी सुद्धा झाली,पण मुहुर्त चुकला ? अशा पक्षात आता ते नेते जमवलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा लोंढा घेऊन पक्षांतर करू शकतात,यांचा काही भरोसा नाही,अशी खमंग चर्चा सुद्धा ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.पक्षात राहून मोठा ग्रुप तयार करायचं आणि तिकीट न मिळाल्यावर ऐन वेळेवर पलायन करायचं ? अशा नेत्यांबद्दलची माहिती पक्षाच्या वरिष्ठ,दिग्गज नेत्यांना असली पाहिजे.असे मत अनेक जण व्यक्त करताना दिसत आहे.काही का असेना पण काही अतिउत्साही "गुडघ्याला बाशिंग" बांधून कामाला लागले आहे.आता पक्षश्रेष्टी आगामी जि.प.प.स.न.प निवडणुकीची तिकीट कुणाला देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.