समस्या सोडविण्याची मुकेश जिवतोडे यांची मागणी
निवेदनातून दिला आंदोलनाचा इशारा
वरोरा, अमृत कुचनकर विशेष प्रतिनिधी : येथील नगर परिषदेच्या प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी घाण्याचे साम्राज्य पसरलेले असून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई देखील सुरू आहे. तसेच अनेक भागातील स्ट्रीट लाईट देखील बंद असल्याने नागरिक त्रस्त आहे. यासह अन्य समस्या त्वरित सोडवाव्या अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी निवेदनातून मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.तसेच समस्या त्वरित मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वरोरा येथील नगरपरिषद मध्ये नगराध्यक्षचा कार्यकाळ संपून दीड वर्षापेक्षाही अधिक झाले आहे. सध्या प्रशासकीय काळ सुरू असून या प्रशासनाचे शहराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वरोरा शहरात ठीक ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहे.कचरा नियमित उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. तसेच अनेक भागात तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. अनेक भागातील स्ट्रीट लाईट देखील बंद आहे. तर काही ठिकाणी स्ट्रीट लाईटचा लपंडाव सुरू आहे.स्ट्रीट लाईटची गरज असलेल्या नवीन अत्यावश्यक ठिकाणी स्ट्रीट लाईट लावले जात नाही आहे. वरोरा शहरात नियम डाउनलोड जड वाहतूक सुरू आहे. यामुळे सतत वाहतूकीचा खोळंबा होत आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी खाजगी कंत्राटदारा मार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. परंतु हा पाणीपुरवठा पूर्ण शहरात करण्याचे आवश्यक असताना व तशी अट कंत्राट मध्ये दिली असताना काही विशिष्ट भागातच हीतसंबंध जोपासून व आर्थिक फायदा जास्तीत जास्त मिळावा या दृष्टीने कंत्राटदार टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. परिणामी इतर भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहे. शहरातील गांधी चौक परिसरातील सौंदर्य लोप पावत चाललेले आहे.
या भागातिल अतिक्रमण आणि घाणीच्या साम्राज्यांमुळे शहरातचे वातावरण खराब झाले आहे. वरील सर्व समस्या तात्काळ सोडवाव्या अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी निवेदनातून नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष जेठानी, रमेश मेश्राम, शहर प्रमुख संदीप मेश्राम किशोर टिपले, बंडूजी डाखरे गणेश चिडे, अतुल नांदे, अनिल गाडगे, मनीष डोहतरे उपस्थित होते . सर्व मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुकेश जिवतोडे यांनी निवेदनातून दिला आहे.