नेरी येथील घटना
चंद्रपूर / सुनिल कोसे, चिमूर : चिमूर तालुक्यातील नेरी येथील ग्राम पंचायत कार्यालया समोर असलेल्या माही हेअर सलुनचे मालक अनिल शालिकराम बारसागडे अंदाजे वय 40 वर्षे यांनी आपल्या दुकानात चार वाजता चे सुमारास गळफास लावुन आपली जिवन यात्रा संपवली.
सविस्तर वृत्त असे की, नेरी येथील व्यावसायिक अनिल शालिकराम श्रीरामे हे दररोज प्रमाणे आपल्या दुकानात गेले होते. ते दुपारी दरेरोज घरी जायचे मात्र आज घरी आले नसल्याने त्यांच्या मुलाने दुकानाकडे जाऊन बघितलं असता अनिल बारसागडे हे दुकानात लटकून दिसले. याची माहिती मुलाने इतरांना सगितली व ही बातमी वाऱ्यासारखी नेरी व परिसरात पोहचली आणि नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली.
सदर मृत्काने आत्महत्या का केली याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नसून सदर बारसागडे हे 10 वर्षांपासून नेरी येथे वास्तव्यास होते ते सावली तालुक्यातील निमगाव निपन्द्रा येथील मूळचे रहिवासी होते सदर बाब कर्जाच्या बोजाने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले पीएसआय सोनुने, बुट्टे पोलीस शिपाई, गोणाडे .यांनी प्रेताचे पंचनामा करून उत्तरनिय तपासणीसाठी चिमुरला रवानगी केली मुतकाच्या मागे पत्नी दोन लहान मुले असा आप्त परिवार आहे पुढील तपास चिमूर ठाणेदार गभने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सोनुने करीत आहेत..