गावाकडची बातमी
चांदूररेल्वे/ कारला: कारला येथील शेतकरी ज्ञानेश्वर कोळवते यांच्या शेतात जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घालून उभ्या तुरीच्या पिकाचे नुकसान केलेले आहे.वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गेल्या काही वर्षातील नैसर्गिक संकटांमुळे शेती खर्चासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. अशा परिस्थितीत जंगली प्राण्यांचा वावर शेतात सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
तरी वनविभागाने त्वरित चौकशी करून शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी शेतकरी करित आहे.